सोशल बिझनेस वाढवेल रोजगार - मुनगंटीवार

 BEST depot
सोशल बिझनेस वाढवेल रोजगार - मुनगंटीवार
BEST depot, Mumbai  -  

कुलाबा - टाटा ट्रस्टच्यावतीनं कुलाबा इथल्या हॉटेल महाल पॅलेसमध्ये इंडिया सोशल बिझनेस फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं. या बिझनेस फोरमला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. सोशल बिझनेसमुळे रोजगार निर्मितीस हातभार लागणाराय. त्यामुळे नोकरीच्या नवीन संधी निर्माण होतील, अशी आशा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. या वेळी सोशल बिझनेसचे संस्थापक नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांनी सोशल बिझनेसवर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सोशल बिझनेस काळाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Loading Comments