किरीट सोमय्यांनी घेतली सायलीची भेट

 Dalmia Estate
किरीट सोमय्यांनी घेतली सायलीची भेट
किरीट सोमय्यांनी घेतली सायलीची भेट
किरीट सोमय्यांनी घेतली सायलीची भेट
किरीट सोमय्यांनी घेतली सायलीची भेट
See all

मुलुंड - इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडून दोन्ही पाय गमावलेल्या सायली ढमढेरेची भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन शनिवारी भेट घेतली. या वेळी लिंब फॉर लाईफची 6 खास मुलं सोमय्या यांच्याबरोबर होती. सायलीचा आत्मविश्वास पुन्हा वाढवण्यासाठी आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा सकारात्मक होण्यासाठी ही भेट घेण्यात आली. रेल्वे अपघातातून बचावल्यानंतर आपल्या पावलांवर ठामपणे उभे राहिलेल्या मोनिका मोरे, कुमार पिसाळ, नवनाथ यमगार, शशिकांत कांबळे, तन्वीर शेख तसंच डॉ. रोशन शेख या सर्वांनी सायलीशी संवाद साधून तिला आत्मविश्वास दिला.

Loading Comments