भांडुपमध्ये तिरंगी लढत रंगणार

Mumbai
भांडुपमध्ये तिरंगी लढत रंगणार
भांडुपमध्ये तिरंगी लढत रंगणार
भांडुपमध्ये तिरंगी लढत रंगणार
भांडुपमध्ये तिरंगी लढत रंगणार
भांडुपमध्ये तिरंगी लढत रंगणार
See all
मुंबई  -  

सोनापूर - मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणूकांसाठी नवीन प्रभाग रचना घोषीत झाल्यानंतर भांडुपमधील वॉर्ड क्र. ११० येथील सोनापूरमध्ये बहूतांश मुस्लिम लोकवस्ती आहे. इथे कॉँग्रेसची वोट बॅंक आहे. त्यामुळे पक्षाकडून तिकीट मिळावं म्हणून कॉँग्रेसच्या दोन दिग्गज नगरसेवकांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू झालीये. त्यातच आणखी एका नेत्यानेही या वॉर्डसाठी फिल्डिंग लावल्याने निवडणूकीपूर्वीच कॉँग्रेसमध्ये अंतर्गतच तिरंगी लढत पहायला मिळतेय.

भांडुप पश्चिमेकडील सोनापूर, तुलशेतपाडा, मिलिंदनगर, लेक रोड, भांडुप पोलीस ठाणे, भांडुप व्हीलेज, सुभाष नगर ते सीएट कंपनी हा १०४ आणि १०५ या वॉर्ड विभागून नवीन ११० वॉर्ड तयार करण्यात आलाय. हा वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. त्यामुळे या नवीन वॉर्डातून कॉग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर, गोपीनाथ पाटील आणि तात्या थोरात या तीन दिग्गजांमध्ये तिकीटासाठी लढाई सुरू झालीये. कोपरकर यांच्या जुन्या १०४ वॉर्डातील प्रभाग १०९ मध्ये गेले असून तो ओबीसी महिला वार्ड आहे. त्यांनी तेथून निवडणूक लढवावी, असं पाटील यांचं म्हणणं आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.