Advertisement

दिशा सालियान प्रकरणात होणार आदित्य ठाकरेंची चौकशी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

दिशा सालियान प्रकरणात होणार आदित्य ठाकरेंची चौकशी
SHARES

शिवसेनेचे (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या ( Disha Saliyan) मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी(SIT) (विशेष तपास पथक) राज्य सरकारच्या वतीने तपास करणार आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची (Sushant singh rajput) मॅनेजर दिशा सालियन हिचे 8 जून 2020 रोजी निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाने आत्महत्या केली होती. मात्र, त्यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला.

भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुमारे 6 दिवसांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची ड्रग्ज चाचणी करावी, अशी मागणीही नितीश राणे यांनी केली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

दिशा सालियनच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दिशा सालियन प्रकरणी आता राज्य सरकार आदित्य ठाकरे यांची एसआयटीकडून चौकशी करणार आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथक काम करणार आहे. तपासात अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.हेही वाचा

7 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा