‘रईस’साठी शाहरुखने घेतली राज ठाकरेंची भेट

    मुंबई  -  

    वांद्रे - शाहरुखचा आगामी चित्रपट रईस आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. जस जशी या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येतेय तस तसं शाहरुख खानचं टेन्शनही वाढतंय. कारण आहे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. 'ए दिल ए मुश्किल'ला मनसेनं केलेला विरोध लक्षात घेता रईसच्या चित्रपट प्रदर्शनावेळी काय होतं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याच पार्श्वभूमीवर रविवारी शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पाऊण तास या दोघांची भेट झाली असून माहिराला प्रमोशनसाठी आणणार नाही, असं आश्वासन शाहरुखनं दिलंय. एवढच नाही तर यापुढे पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नसल्याचं आश्वासन शाहरुखनं दिलंय. शाहरुख राजच्या भेटीनंतर आता ‘रईस’चा मार्ग मोकळा झालाय असं म्हणायला काही हरकत नाही.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.