Advertisement

शिवसेना लागली कामाला !


शिवसेना लागली कामाला !
SHARES

कांदिवली - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना कामाला लागली आहे. राज्यात जरी भाजप-सेना युती असली, तरी मुंबईत हे दोन्ही सत्ताधारी पक्ष स्वतंत्र लढण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे पालिकेवर सत्ता शाबूत ठेवण्यासाठी सेनेने कंबर कसली आहे. सेनेच्या स्थानिक शाखांमध्ये त्या अनुषंगाने बैठका सुरु झाल्या आहेत. मुंबईच्या विभाग क्रमांक 2ची जबाबदारी शिवसेनेचे वरिष्ठ नेते व उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर सोपवण्यात आली असून समन्वयकाची जबाबदारी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यावर आहे. याच धर्तीवर बुधवारी रात्री शिवसेना शाखा क्रमांक 18, 19 व 28ची चारकोपमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभाग प्रमुख वसंत गुडूलकर, नगरसेवक श्रीकांत कवठणकर यांनी शिवसैनिकांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी राजन निकम यांची शाखाप्रमुख म्हणून तर सर्व उपशाखाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली.​​

संबंधित विषय
Advertisement