SHARE

सीएसटी - मुंबई महापालिकेत 20 वर्षांपासून सेना-भाजपची सत्ता होती. त्यांनी त्यांच्या वचननाम्यात पाणी, आरोग्य, शिक्षण, उड्डाण पूल, स्वच्छता, मलनिस्सारण, पूर नियंत्रण विकास योजना, परिसर विकास, आपत्ती निवारण, मैदाने, अग्निशमन, मराठी अस्मिता इत्यादी आश्वासने त्यांच्या वचननाम्यात दिली होती. त्यापैकी 10 टक्केच कामं केली, बाकी 90 टक्के कामे कागदावरच राहिली. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला विकास कामांचं गाजर दाखवून सामान्य जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.

मालमत्ता करमुक्ती ही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेला निर्णय आहे. तोच आता शिवसेनेने घोषित केला आहे. सेना-भाजपा युतीने मागील 20 वर्षांत जनतेला आश्वासने देऊन फसवणूक करण्याचे पाप केले आहे. त्या पापापासून मुक्ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 5 वर्षांत युतीने केलेले घोटाळे आम्ही बाहेर काढू असे निरुपम म्हणाले.

उमेदवारी संदर्भात कार्यकारिणीची बैठक झाली असून, उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत सविस्तर निवेदन राहुल गांधी यांना देणार असून, उमेदवाराबाबतचा निर्णय तेच घेतील, असं निरूपम म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या