शिवसेनेने मुंबईचे पाटणा केले - देवेंद्र फडणवीस

  मुंबई  -  

  अंधेरी - शिवसेनेने २० वर्षांत मुंबईचे रूपांतर पाटण्यात करून टाकले, अशी टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. आम्ही फक्त आश्वासन देत नाही ती पूर्णही करून दाखवतो, भाजपाने 2 वर्षांत मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली. 5000 सीसीटीव्ही कॅमेरे शहरभर लावले. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बुधवारी अंधेरीत शेरेपंजाब इथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

  या सभेत आशिष शेलार, रामदास आठवले उपस्थित होते. शिवसेना, काँग्रेसने मुंबईची दशा केली. सभेत डंपिंग ग्राऊंड, मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टीधारकांचे पूनर्वसन आदी विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टार्गेट केले. शिवसेनेनेची मराठीची साथ सोडली म्हणून ते ‘डीड यु नो’ सारखे इंग्रजी प्रचार करू लागले आहेत. काँग्रेस, शिवसेना दोन्ही भ्रष्टाचारी आहेत. भाजपा मुंबईला आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त बनवेल आणि पारदर्शी सत्ता पालिकेवर आणू असे देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी आश्वासन दिले.

  शिवसेनेने केंद्राचा सर्व्हे नीट वाचलेला नाही. मुंबई पारदर्शकतेत पहिल्या क्रमांकावर नसून तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. तसंच शिवसेनेच्या जाहिरनाम्यात प्रेरणास्थान असणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख करायला पक्षप्रमुख विसरलेत आणि मला अर्धवटराव म्हणत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.