Advertisement

'मोदींच्या लघुपटासाठी कोणताच आदेश काढला नाही'


'मोदींच्या लघुपटासाठी कोणताच आदेश काढला नाही'
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला लघुपट राज्यातील शाळांमध्ये दाखवण्यासाठी आम्ही कोणताही आदेश काढला नाही, असं सांगत तावडे यांनी मोदी यांच्या लघुपटावर निर्माण झालेल्या वादावर आपले हात वर केले आहे. येत्या 18 सप्टेंबरला 'चलो जीते हैं' हा लघुपट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे.


सोशल मीडियावर चर्चा

शालेय शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारचे परिपत्रक न काढता त्यासाठीची तयारी करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. या संदर्भात दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्याने विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे. त्यावर तावडे यांना विचारले असता त्यांनी याविषयी कोणतेही आदेश जारी करण्यात आले नाहीत. यामुळे याविषयी ज्यांना टीका करायची आहे त्यांनी करावी, असं सांगत त्यांनी या वादातून आपले हात वर केले आहे.


'चलो जीते हैं'

राज्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये 'चलो जीते हैं' हा लघुपट दाखवण्यासाठी राज्यातील गटशिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रामुखांच्या व्हाइट्सवर एक मेसेज पाठवण्यात आला असून त्यासाठी अनेक ठिकाणी बैठका सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकांसह उपसशिक्षण अधिकाऱ्यांनी यावर तोंडावर बोट ठेवलं असून याविषयी ते कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास तयार नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा