'ब्ल्यू व्हेल' गेम थांबवण्यासाठी केंद्राची मदत घेणार - मुख्यमंत्री

  Mumbai
  'ब्ल्यू व्हेल' गेम थांबवण्यासाठी केंद्राची मदत घेणार - मुख्यमंत्री
  मुंबई  -  

  'ब्ल्यू व्हेल' गेम खेळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
  'ब्ल्यू व्हेल' गेमच्या वेडापायी, अंधेरीतील मेघवाडी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सिंगने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी 'ब्ल्यू व्हेल' गेमचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.


  काय म्हणाले अजित पवार?

  सरकारने पुढाकार घेऊन, वेळ पडली तर केंद्र सरकारशी संपर्क साधून तसेच आपले वजन वापरुन देशपातळीवरच 'ब्ल्यू व्हेल' गेम पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे आहे.


  हा विषय गंभीर आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या संदर्भातील आवश्यक सगळी माहिती घेतली जाईल. हा इंटरनेट बेस गेम असल्याने, त्याचे सर्व्हर आपण होस्ट करत नाही, तो बाहेरुन आला आहे. त्यामुळे हा गेम कसा थांबवता येईल, याबाबत केंद्र सरकारशी बोलून त्यानुसार कारवाई केली जाईल.
  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


  काय आहे 'ब्ल्यू व्हेल' गेम?

  • सोशल मीडियावर ऑनलाईन 'डेथ ग्रुप' नावाने देखील हा गेम ओळखला जातो
  • 'ब्ल्यू व्हेल' गेममध्ये प्लेअर्सना 50 वेगवेगळे टास्क दिले जातात
  • हे सर्व टास्क 50 दिवसात पूर्ण करावे लागतात
  • टास्क पूर्ण केल्याचा पुरावा देण्यासाठी फोटो किंवा व्हीडिओ पाठवावा लागतो
  • गेममध्ये प्लेअर्सना एक ट्रेनर दिला जातो
  • पुढचे 50 दिवस प्लेअर्सना हा ट्रेनर नियंत्रित करतो
  • ट्रेनरच्या सांगण्यावरून मुले टास्क पूर्ण करतात
  • एकदा गेम सुरू केला की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही
  • इंग्लंडच्या एका वेबसाईटनुसार, प्लेअर्सने टास्क पूर्ण केले नाही तर त्यांना धमकीचे मेसेज येतात
  • हा गेम ग्रुपने देखील खेळला जातो
  • मध्यरात्री उठून एखादा हॉरर मुव्ही बघणे
  • किंवा स्वत:ला जखमी करून घेणे, असे टास्क दिले जातात
  • त्यानंतर आत्महत्या करणे, या खेळाचा शेवटचा टप्पा असतो


  हे देखील वाचा -

  मुलांच्या जीवाशीच खेळणारा 'ब्ल्यू व्हेल' गेम


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.