किस्सा आठ करोड का!

 Mumbai
किस्सा आठ करोड का!

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2016 मध्ये केलेली महाराष्ट्र वारी पूर्वनियोजित होती. मात्र पंतप्रधानांच्या भेटीसाठी राज्य सरकारला करावा लागलेला खर्च अकस्मिक होता. दोन्ही वाक्यांमध्ये विसंगती असली तरी ती वास्तवाला धरुन आहेत. मुंबईत होऊ घातलेली विकासकामं आणि त्या कामांची प्रसिद्धी यासाठी राज्य सरकारने तब्बल आठ कोटी रुपए खर्च केले. विशेष म्हणजे ही रक्कम आयत्या वेळेचा खर्च म्हणून वापरण्यात आली, जिला मंजुरी मिळवण्यासाठी अकस्मिक खर्चाच्या श्रेणीत दाखवण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दस्तावेजांमधून ही माहिती समोर आली आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जलपूजन कार्यक्रम, मुंबई शहरी परिवहन प्रकल्पांतर्गत मेट्रोलाइनचं उद्घाटन, शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प आणि नव्या रेल्वे मार्गासाठीच्या जाहिरात आणि प्रसिद्धीखर्चासाठी आठ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.’ महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविभागामार्फत सादर झालेल्या अनुदानासंदर्भातल्या पुरवणी मागण्यांमध्ये हे नमूद आहे. हा खर्च भागवण्यासाठी अकस्मिक निधीतून रक्कम काढणे गरजेचे होते. कारण हा खर्च अत्यावश्यक सदरात मोडणारा होता, असा सार्वजनिक बांधकाम विभागाचा युक्तिवाद आहे.

Loading Comments