'ईव्हीएमचा वापर बंद करा, नाही तर महाराष्ट्र बंद करू', वंचित बहुजन आघाडीचा इशारा

महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

SHARE

महाराष्ट्रात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनचा गैरवापर होत असल्यानं ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं 'ईव्हीएमचा वापर बंद करण्यात आला नाही, तर या मागणीसाठी राज्यभरात बंद पाळण्याचा' इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहेवंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. . आर. अंजारिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमला पक्षाचा असलेला विरोध स्पष्ट केला.

ईव्हीएम हटवण्याची मागणी

वंचित बहुजन आघाडीतर्फे ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. राज्यातील ३०० पेक्षा जास्त तहसीलदार कार्यालयं, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली. आघाडीच्या नेत्यांनी याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, संयुक्त निवडणूक अधिकारी व अतिरिक्त निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली व त्यांना पक्षाची भूमिका सांगितल्याचं समजतं.

याबाबत ईव्हीएम मशीनला असलेला विरोध व त्याबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवण्यात येईल असं आश्वासन दिल्याचं डॉ. अंजारिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.हेही वाचा -

पावसाळ्यानंतर पुलांसह अन्य कामं करावीत, मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे रेल्वे प्रशासनाला पत्र

गणिताच्या पुस्तकातील बदल स्विकारा- अतुल कुलकर्णीसंबंधित विषय
ताज्या बातम्या