पावसाळ्यानंतर पुलांसह अन्य कामं करावीत, मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे रेल्वे प्रशासनाला पत्र

नवे पादचारी पूल तयार करण्यासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आलं आहे. तसंच, अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या डोक्यावर छप्पर नसल्याची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पावसाळ्यानंतरच पुलांची कामं करा, असे आदेश रेल्वेला दिले आहेत.

SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर मध्य रेल्वेनं मुंबईतील पादचारी पुलांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. ऐन पावसाळ्यात देखील ही कामं सुरू असल्यानं रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नवे पादचारी पूल तयार करण्यासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आलं आहे. तसंच, अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या डोक्यावर छप्पर नसल्याची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पावसाळ्यानंतरच पुलांची कामं करा, असे आदेश रेल्वेला दिले आहेत.

दुरुस्तीची कामं

मध्य रेल्वेवर १५ नवीन पादचारी पूल आणि १४ पुलांच्या दुरुस्तीचं कामांसह अनेक स्थानकातील फलाटांवर नवीन छप्पर बसवण्याच्या कामं देखील सुरू आहेत आहे. पूल उभारणी व दुरुस्ती कामांमुळं स्थानकातील उर्वरित पुलांचा वापर प्रवासी करत आहेत. परंतु ऐन गर्दीच्या वेळी उर्वरित पुलांवर मोठा भार पडून धक्काबुकी होते. या कामांसाठी फलाटांवर सामान ठेवलं जातं आणि खड्डेही पडतात. त्यामुळं प्रवाशांना पावसाळ्यात मोठ्या गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

प्रवाशांना धोका

यासाठी काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.के.जैन यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून पावसाळ्याच्या तोंडावर अशी कामं नकोत. रेल्वे स्थानकांत अनेक ठिकाणी पुलांसाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामुळं प्रवाशांच्या जिवालाही धोका उत्पन्न झाला असल्यानं ही कामं तातडीनं थांबवून पावसाळ्यानंतरच ही कामं पुन्हा सुरू करावीत, असं या पत्रात म्हटलं आहे.


पुलांची सद्यस्थिती

  • विक्रोळी, मुलुंड, ठाकुर्ली, डोंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डीसह काही स्थानकांत एकूण १५ नवीन पादचारी पुलांचं काम सुरू आहेत.
  • मशीद स्थानकात दोन, कुर्ला, माटुंगा, दादर, विक्रोळी, भांडुप, ठाणेसह एकूण १४ जुन्या पादचारी पुलांची दुरुस्ती कामे सुरू आहेत.हेही वाचा -

गणिताच्या पुस्तकातील बदल स्विकारा- अतुल कुलकर्णीसंबंधित विषय
ताज्या बातम्या