महापरिनिर्वाण दिन आणि बॅनरबाजी....

  मुंबई  -  

  दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भीमसैनिकांचा 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर जनसागर उसळतो. यंदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. साहजिकच सर्वच राजकीय पक्षांचे यंदा चैत्यभूमीकडे विशेष लक्ष होते. वरळीच्या प्रभाग क्रमांक 195मध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राजकीय पक्षांचे बॅनर झळकलेत. शिवाजी पार्कवर शिवसेनेकडूनही स्टॉल उभारण्यात आलेत.

  मनसे, भाजपा, शिवसेना,काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस. सगळेच पक्ष भीमसैनिकांच्या मनात घर निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. महापालिका निवडणुकीत या धडपडीचा या पक्षांना फायदा होतो की नाही, याचे उत्तर आपल्याला निकालानंतरच मिळेल. या निमित्तानं डॉ. आंबेडकरांना अभिवादन करायला आलेल्यांना सुखसुविधा मिळत आहेत, हे मात्र खरं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.