चेंबूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार


  • चेंबूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार
SHARE

चेंबूर - चेंबूरमधले राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात असल्याची बातमी आठ दिवसांपूर्वी मुंबई लाइव्हनं दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे मुंबई संघटक सुभाष मराठे आणि तालुका अध्यक्षा आशा मराठे यांनी दोन हजार कार्यकर्त्यांसह रविवारी भाजपात प्रवेश केला.

रविवारी शगुन लॉन येथे भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजप प्रवक्ते महादेव भंडारी, जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर,चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळंज आणि पालिकेतील गटनेते मनोज कोटक आदीही उपस्थित होते. मराठे यांच्या भाजपाप्रवेशामुळे चेंबूरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.

आधीची बातमी वाचण्यासाठी -

https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/m/4/2890

संबंधित विषय
ताज्या बातम्या