Advertisement

तर तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचेच नाहीत, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

प्रशासनात काम करणारे आयपीएस अधिकारी जर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला माहिती देतात असं वाटत असेल, तर तुम्ही महाराष्ट्रात राज्य करण्याच्या लायकीचेच नाही..!

तर तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचेच नाहीत, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला
SHARES

प्रशासनात काम करणारे आयपीएस अधिकारी जर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला माहिती देतात असं वाटत असेल, तर तुम्ही महाराष्ट्रात राज्य करण्याच्या लायकीचेच नाही..! अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला आहे. 

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा आरोप सध्या ठाकरे सरकारमधील नेत्यांकडून केला जात आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, जेव्हा राज्यकर्त्यांची चोरी पकडली गेली, तेव्हा त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शासनाची गोपनीय माहिती बाहेर आल्यावर त्यांना जाग आलेली दिसत आहे. जर आयपीएस अधिकारी भाजपला माहिती देत असल्याचं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही राज्य करण्याच्या लायकीचेच नाहीत.

हेही वाचा- आधी अभ्यास करा, मगच बोला; संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

राज्य करत असताना जर तुमच्या मनात प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी प्रेमभावना नसेल, तुमच्या संभ्रमावस्थेमुळे अधिकारीच जर विरोधी भूमिका घेत असतील, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकारच राहिलेला नाही. राज्य करण्याची तुमच्यात शक्ती देखील नाही. तुमच्या विरोधात तक्रार केल्यावर अधिकारी कुणाच्या तरी पे रोलवर आहेत, असं जर तुम्ही म्हणत असाल, तर तुम्ही कोणाच्या पे रोलवर आहात? असा माझा त्यांना सवाल आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात अशा शब्दांचा वापर करणं यापेक्षा कुठलीही गंभीर गोष्ट असू शकत नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

रश्मी शुक्ला यांनी राजेंद्र यड्रावकर यांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी धमकावले असेल किंवा गृह सचिवांची परवानगी न घेता दूरध्वनी टॅप केले असतील, तर त्यांच्यावर महाविकास सरकारने कायदेशीर कारवाई का केली नाही ? माफी मागितल्यावर एखाद्या अधिकाऱ्याला सोडून द्यायचं, ही संविधानातील व कायद्यातील कोणती पद्धत मुख्यमंत्र्यांनी राबविली, अशी कायद्यात तरतूद आहे का? असे प्रश्न उपस्थित करत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरलं.

(sudhir mungantiwar criticised thackeray government over rashmi shukla report)

हेही वाचा- ज्या गोष्टीशी संबंध नाही, त्यावर.., नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा