Advertisement

आधी अभ्यास करा, मगच बोला; संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

हा दिल्लीतील विषय असल्याने महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये यावर चर्चा होऊ नये. तसंच राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये.

आधी अभ्यास करा, मगच बोला; संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत काय? शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चा घटक नसल्याने राऊत यांना यूपीएचा अध्यक्ष कोण असावा यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा संताप व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना संजय राऊत (sanjay raut) यांनी अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय हा राज्याचा नव्हे, तर राष्ट्रीय विषय असल्याचंही सुनावलं आहे.

आज यूपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे, यूपीएची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी यूपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. त्यावर यूपीएचं नेतृत्व कोणी करावं हे यूपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊत शरद पवार (sharad pawar) साहेबांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये, इतकाच आमचा त्यांना सल्ला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.

तर शिवसेना यूपीएचा घटक नाही. त्यांनी आधी यूपीएचा घटक व्हावं आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले होते. 

हेही वाचा- ज्या गोष्टीशी संबंध नाही, त्यावर.., नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला

या काँग्रेस नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. शिवाय शरद पवार किंवा उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. यूपीएसंबंधी बोलण्यासाठी यूपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. यूपीए हा काही राज्याचा विषय नाही, हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात विरोधी पक्षांची  एका मजबूत आघाडी निर्माण व्हावी ही काळाची गरज आहे. 

तसं न झाल्यास तुम्ही भाजपचा पराभव कशा रितीने करणार आहात? याचं उत्तर मला विरोध करणाऱ्यांनी द्यावं. यूपीए मजबूत व्हावं असं काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वाटत नसेल, तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. हा दिल्लीतील विषय असल्याने महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये यावर चर्चा होऊ नये. तसंच राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये.

या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत. त्यामुळे मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल, तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

(sanjay raut replies congress leaders on UPA president)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा