Advertisement

ज्या गोष्टीशी संबंध नाही, त्यावर.., नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला

संजय राऊत यांनी विनाकारण मत मांडून वातावरण बिघडवू नये, असा सल्ला काँग्रेसचे नेते त्यांना देत आहेत.

ज्या गोष्टीशी संबंध नाही, त्यावर.., नाना पटोलेंचा राऊतांना सल्ला
SHARES

आता संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)ची ताकद कमी झाली असून यूपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं होतं. राऊत यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संजय राऊत (sanjay raut) यांनी विनाकारण मत मांडून वातावरण बिघडवू नये, असा सल्ला काँग्रेसचे नेते त्यांना देत आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत?

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ यूपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत असताना यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील (congress) नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज यूपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे, यूपीएची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे यूपीए अधिक मजबूत होण्यासाठी यूपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी नसून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच अशा सूचना येत आहेत. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. 

हेही वाचा- संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत?, काँग्रेसचा संताप

त्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यूपीएचं नेतृत्व कोणी करावं हे यूपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊत शरद पवार (sharad pawar) साहेबांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये, इतकाच आमचा त्यांना सल्ला आहे, असं नाना पटोले म्हणाले.

आधी यूपीएचं सदस्य व्हा

शिवसेना यूपीएचा घटक नाही. त्यांनी आधी यूपीएचा घटक व्हावं आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल. त्यांना सातत्याने काही ना काही लिहावं लागतं. त्यामुळे ते सातत्याने अशा मागण्या करत असतात. एकदा सांगूनही ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतं. राज्यातली आघाडी एका विशिष्ट परिस्थितीत आहे. वैचारिक भिन्नता असूनही भाजपचा (bjp) विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यूपीए हे राष्ट्रीय दल आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

(congress maharashtra president nana patole slams sanjay raut over UPA president)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा