Advertisement

बॅटिंग करायला अधिक मजा येते, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला

विधिमंडळ सभागृह असो वा प्रसार माध्यमं किंवा कुठल्याही जाहीर व्यासपीठावर बोलताना आपल्या वाकचातुर्याने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी क्रिकेटच्या पीचवरही सत्ताधाऱ्यांना टोलवलं.

बॅटिंग करायला अधिक मजा येते, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला
SHARES

विधिमंडळ सभागृह असो वा प्रसार माध्यमं किंवा कुठल्याही जाहीर व्यासपीठावर बोलताना आपल्या वाकचातुर्याने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी क्रिकेटच्या पीचवरही सत्ताधाऱ्यांना टोलवलं.    

महाराष्ट्राच्या खेळपट्टीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळतेय. त्यात विरोधी पक्षाच्या बाजूने देवेंद्र फडणवीस चांगलीच फटकेबाजी करत आहेत. कधी मराठा आरक्षण, तर कधी शेतकरी कर्जमाफी, कोरोना काळातील भ्रष्टाचारासोबतच वीज बिल माफीवरून भाजपने सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आसूड ओढले. पाठोपाठ सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, पुढं वाढत गेलेलं ड्रग्ज प्रकरण, कंगना रणौत आणि महापालिकेची कारवाई, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून भाजपने सत्ताधाऱ्यांना अक्षरश: जेरीस आणलं. त्यानंतर विरोधकांच्या हाती लागला माजी वनमंत्री संजय राठोड यांचा मुद्दा. या मुद्द्यावरून विरोधकांनी इतका जबर मारा केला की बघता बघता वनमंत्र्यांचा बळी अगदी सहज मिळाला. 

सध्यस्थितीत अँटिलिया स्फोटक प्रकरण, परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग अशा तिहेरी मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने चांगलीच फिल्डींग लावली असून गृहमंत्र्यांचा बळी मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अर्थातच देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आपल्याचा नेतृत्व कौशल्याचा खुबीने वापर करून घेत आहेत. 

हेही वाचा- सरसकट लॉकडाऊन नको, कठोर निर्बंध करण्याचं मंत्र्यांचं मत

भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी गुरूवारी क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं. या सामन्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी क्रिकेटच्या पीचवर उतरुन हातात बॅट घेऊन फडणवीसांनी काही बाॅलही टोलवले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत मोजक्या शब्दांत सत्ताधाऱ्यांना टोला हाणला.

ते म्हणाले, मला बॅटिंग करायला अधिक मजा येते. पण मी बॉडीलाइन बॉलिंग करीत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन दी स्टम्प्स, योग्य प्रकारचा बॉल टाकतो म्हणूनच विरोधकांना तो बॉल खेळताना थोडी अडचण येते. 

तसंच यूपीए च्या अध्यक्षपदावर भाष्य करताना, यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनाही टोमणा मारला.

(maharashtra opposition leader devendra fadnavis slams maha vikas aghadi government)

हेही वाचा- मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा