शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - तटकरे

  Nariman Point
  शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - तटकरे
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, उलट दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र येतील असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपा-शिवसेनेवर केला आहे. सध्या ज्या प्रकारे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत, त्यावरून असं वाटतं की राज्यातील राजकारणाचा स्थर खालवला आहे असेही तटकरे यावेळी म्हणालेत.

  मध्यवर्ती निवडणुका जाहीर झाल्या तर राष्ट्रवादी तयार असेल असंही त्यांनी सांगितले.

  महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री स्वराज्य संस्था निवडणुकीत कधीच उतरले नाहीत. सध्या मात्र भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचारात कोणत्या हेतून उतरतात हे माहीत नाही, मात्र त्याचा परिणाम राज्य कारभारावर होत असून, शासकीय कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.

  मित्र पक्षाचे तीन ते चार विधानपरिषदेचे सदस्य झाले. तशा जागा सोडल्या असे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ते भाजपाचे विधानपरिषदेचे सदस्य आहेत असे विधानसभेत नोंद असल्याचे सूत्राकडून समजल्याचे तटकरे म्हणालेत. तसे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कधीच मदत करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.