शिवसेना-भाजपा पुन्हा सत्तेसाठी एकत्र येतील - तटकरे

Nariman Point, Mumbai  -  

नरिमन पॉइंट - मुंबई महापालिका निवडणुकीत या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे यात 8 महिला आहेत. या सगळ्यांचं कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केलं.

बैठकीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला. त्याचवेळी राज्यात जिथे सत्ता स्थापन करणं शक्य आहे, तिथे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या भूमिकेशी मात्र या वेळी फारसे बोलणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळले.

Loading Comments