Advertisement

नायला कादरींनी भारताकडे मागितली मदत


नायला कादरींनी भारताकडे मागितली मदत
SHARES

सीएसटी - पाकिस्तानने बलुचिस्तानवर कब्जा करत तिथे नरसंहार, दहशतवाद आणि बलात्काराच्या घटना घडवून आणत दहशत माजवली आहे. हे जगासमोर आणणाऱ्या बलुच नेत्या नायला कादरी यांनी भारताला मदतीसाठी आवाहन केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
बलुचिस्तानचा प्रश्न काश्मीरशी जोडू नका. राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करू नका असंही कादरी यांनी म्हटलं. बलुच भारतावर विश्वास दाखवत असून भारतानं आमच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे असं त्या म्हणाल्या. भारतात बलुच विझासाठी आल्यास त्याला पाकिस्तानी समजू नये. तसंच भारतानं असे एक कार्ड द्यावे ज्यामुळे बलुच भारतात सोयीस्कररित्या ये-जा करू शकेल, अशी मागणी त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. आम्हाला भारताचा पाठिंबा हवा आहे, कारण पाकिस्तानची मुख्य भूमिका दहशतवादाचा प्रचार करणं आहे. भारतातील प्रसार माध्यमांनी बलुचची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलून धरल्याचे सांगत कादरी यांनी आभार व्यक्त केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा