Advertisement

देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे

देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.

देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे
SHARES

देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत सुळेंनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींकडे अजित पवारांनी भाषणाची मागणी केली होती. मात्र, त्या कार्यक्रमात फडणवीस यांना बोलण्याची संधी देण्यात आली आणि अजित पवारांना बोलू दिले नाही. मोदी पुण्यात दाखल होताच अजित पवार त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ज्या जिल्ह्यात पंतप्रधान जातात तेथील पालकमंत्र्याला त्यांच्यासोबत राहावे लागते तो या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे अजित दादांचे हे कर्तव्य आहे. पण त्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू न देणे हे मला अयोग्य वाटले.

अजित पवारांच्या कार्यालयाने पीएम ऑफिसला विनंती केली होती की, अजित पवारांना भाषण करायचे आहे. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे हे त्यांचे अधिकार आहे. मात्र, पीएम कार्यालयाने अजित दादांच्या भाषणाला परवागणी दिली नाही, असे अतिशय गंभीर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.



हेही वाचा

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं ब्रृजभूषण सिंह यांच्याकडून स्वागत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा