Advertisement

'स्मार्ट सिटी' प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावं- मुख्यमंत्री


'स्मार्ट सिटी' प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावं- मुख्यमंत्री
SHARES

पर्यावरण संवर्धनासाठी 'स्मार्ट सिटी' उभारणं महत्त्वाचं असून, राज्यातील प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं.

स्वीडनच्या 'स्मार्ट सिटी'चे अध्यक्ष तथा आयव्हीएल संस्थेचे उपाध्यक्ष ओस्टेन इकेनग्रेन यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, स्वीडन पर्यावरण संशोधन संस्थेच्या व्यवसाय विकास आणि विपणन व्यवस्थापक रूपाली देशमुख, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे उपस्थित होते.

स्मार्ट सिटी उभारण्याठी नियोजन करताना सांडपाणी व घनकचऱ्याचं पुनर्विघटन करून ऊर्जा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचं काम पुण्यात सुरू आहे. नागपूर व नवी मुंबई येथेही हे प्रकल्प करण्याचा मानस आहे. या प्रकल्पांच्या आखणीसाठी व अंमलबजावणीसाठी स्वीडनने सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

या चर्चेदरम्यान बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औद्योगिक पर्यावरण चांगले राखावं. पाण्याच्या बाटल्यांचं पुनर्विघटन करण्यासाठी मंत्रालय व सार्वजनिक ठिकाणी बाटल्यांचे व्हेडिंग मशिन ठेवण्याची गरज असल्याचं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा