आमदार तारासिंग यांना धमकी

 Dalmia Estate
आमदार तारासिंग यांना धमकी

मुलुंड - भाजपा आमदार सरदार तारासिंग यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच आला आहे.

मुलुंड मतदार संघाचे अामदार असलेल्या तारासिंग यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी हे धमकीचे पत्र पाठवले होते. या पत्रातून " तुम आमदार हो, तुमको एक करोड रुपया देना पडेगा, नही तो जान से हाथ धोना पडेगा, एक करोड रुपया लेके मरिन ड्राइव्ह पे अा जाओ", अशी धमकी देण्यात आली. या धमकीच्या पार्शवभूमीवर सरदार तारासिंग यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, खंडणी विरोध पथक यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, "पोलिसांची सुरक्षा आणि तपास यंत्रणा यांच्यावर माझा विश्वास आहे", असे सरदार तारासिंग यांनी म्हटले आहे.

Loading Comments