Advertisement

सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...


सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...
SHARES

मुंबईतील दादर स्थानकात एका टॅक्सी चालकानं राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची वाट अडवल्याची माहिती समोर येत आहे. कुलजीत सिंह मल्होत्रा असं त्या टॅक्सी चालकाचं नाव आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली असून, त्यांनी 'एक विचित्र अनुभव आल्याचं सांगत या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांकडं तक्रार दाखल केली.


टॅक्सी सेवेसाठी विचारणा


'दादर रेल्वे स्थानकावर कुलजीत सिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक ट्रेनमध्ये येऊन टॅक्सी सेवेसाठी विचारणा करत होता. त्याला दोनदा नकार देऊनही तो माझा मार्ग अडवत होता. इतकंच नाही, तर निर्लज्जपणे त्यानं फोटोसाठीही विचारणा केली. तसंच, यानंतरही निर्लज्जपणे तो फोटो काढण्यासाठी पोझ देत होता. या सर्व प्रकरणानंतर दादर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे अधिकाऱ्यांकडं तक्रार केली असता त्यांनी तेथील आरपीएफच्या मदतीनं त्या टॅक्सी चालकाला अटक करुन दंड ठोठविल्याचा मेसेज पोलिसांनी केला', असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

असा अनुभव पुन्हा नको

टॅक्सी सेवेची विचारणा करणाऱ्यांना रेल्वे स्थानकावर आणि विमानतळांवर परवानगी नसल्याचं सांगत केवळ नेमलेल्या टॅक्सी स्टँडवरच अशा प्रकारे सेवेची संमती असल्याचं त्यांनी म्हटलं. रेल्वेमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, म्हणजे प्रवाशांना असा अनुभव पुन्हा येणार नाही अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.हेही वाचा -

मुंबईतील ‘या’ भागांत ३० तास पाणीकपातRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा