SHARE

दादर - उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. "उरीवर झालेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. त्यानंतरही आपण का गप्प बसलोय", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला."पाकिस्तानशी आता केवळ चर्चेने काम होणार नाही. त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. युद्ध देशासाठी व्हावं, निवडणुकांसाठी होऊ नये", असs स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलs.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना या प्रश्नावर एक दिवसीय स्वतंत्र अधिवेशन बोलवावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणावर प्रत्येक नेत्याने अधिवेशनात मत मांडावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या