शिवसेनेची विजयी रॅली

  Borivali
  शिवसेनेची विजयी रॅली
  मुंबई  -  

  बोरीवली - वॉर्ड क्रमांक एकमधील शिवसेनेच्या विजयी उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी रविवारी 26 फेब्रुवारीला विजयी रॅली काढली. गणपत पाटीलनगरपासून ते आयसी कॉलोनीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा सहभाग होता. यापूर्वी काँग्रेसच्या शीतल म्हात्रे या वॉर्डच्या नगरसेविका होत्या. 2017 च्या पालिका निवडणुकीच्या रिंगणात शीतल म्हात्रेही होत्या. पालिकेच्या आर उत्तर विभागात येणाऱ्या 8 वॉर्डमधील 6 वॉर्डवर शिवसेनेने बाजी मारलीय. तर उर्वरित दोन वॉर्ड भाजपाच्या पदरात पडल्याने या वॉर्डमध्ये काँग्रेसचा सुपडा पूर्णपणे साफ झालाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.