काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण

 Govandi
काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण
काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण
See all

गोवंडी - ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण सुरू असल्याचं गोवंडीमध्ये निदर्शनास आलंय. मानखुर्दमधील शिवाजी नगरमध्ये कार्यक्रमावेळी काँग्रेसमधील गटबाजीचं राजकारण पाहायला मिळालं. जाकीर हुसैन परिसरात काँग्रेसतर्फे एकता मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रमात अनेक नेत्यांचे फोटो बॅनरमधून गायब असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे माजी तालुकाअध्यक्ष कार्यक्रमावेळी वेगळ्या गटासोबत चहा पीत उभे असल्याचे पाहायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बॅनरवर काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचे फोटो गायब असल्याचं पाहायला मिळालं. तर माजी खासदार यांचे फोटो झळकत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला गुरूदास कामत यांची लॉबी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.

Loading Comments