अखेर युतीच्या चर्चेला मुहूर्त सापडला

  Pali Hill
  अखेर युतीच्या चर्चेला मुहूर्त सापडला
  मुंबई  -  

  मुंबई - मकरसंक्रांतीनंतर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सोमवारी संध्याकाळी बैठकीची पहिली फेरी होणार आहे. या बैठकीसाठी भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता तर शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर उपस्थित राहणार आहेत. ही बैठक मंत्रालयाच्या समोर असलेल्या बी 7 या ठिकाणी होणार आहे. एका बाजूला बैठक होणार असताना दुसरीकडे दादरमधील वॉर्ड 191 मधून शिवसेनेच्या विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. तर याच वॉर्डमधून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांची पत्नी मेघा सोमय्या यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. युतीवर निर्णय होण्याअगोदरच जागावाटपावरून आताच राजकारण रंगू लागले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.