Advertisement

'भाजपाकडे एवढा पैसा आला कुठून?'


SHARES

कन्नमवारनगर - भाजपाकडे रग्गड पैसा आहे? तो आला कुठून असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. मंगळवारपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रचार सभेचा नारळ फोडला. विक्रोळीतल्या कन्नमवारनगरमध्ये राज यांची सभा झाली यावेळी त्यांनी शिवसेना भाजपाचा खरपूस समाचार घेतला.

या दोन्ही पक्षांमध्ये जी भांडणं सुरू आहेत त्याची कोंबड्यांशी तुलना करत याचा मुंबईशी काही संबंध आहे का? रोजच्या रोज शहरं बकाल होत आहे त्यावर कुणीच काही का नाही बोलत? असं सांगत भाजपा-शिवसेनेवर राज ठाकरेंनी यावेळी जोरदार टीका केली. नोटाबंदीचाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. 'आठ तारखेला नोटा बंद झाल्या, वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते, पुढल्या वर्षी बघा, नोटबंदीने नवा भारत दिसेल, म्हणून मी यावर्षी बघतोय नवा भारत दिसतोय का? असा टोला त्यांनी भाजपावर हाणला. 

'जो स्वत:च्या जीवावर बसतो त्याने शब्द द्यायचा असतो'

दरम्यान, विलेपार्लेच्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'जो स्वत:च्या जीवावर बसतो त्याने शब्द द्यायचा असतो" असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 

(विलेपार्लेच्या सभेतील राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण)

काय म्हणाले राज ठाकरे - 

शिवसेना-भाजपामध्ये जी भांडणं चालू आहेत, त्याचा मुंबईशी काहीच संबंध नाही 

सगळीकडे कॅश चालू आहे, कॅशलेस भारत कुठे गेला?

नोटाबंदीनंतर पूर्वीचीच परिस्थिती कायम आहे, केवळ लोकांना त्रास झाला

नोटाबंदीने काय साध्य झालं, त्याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं

भाजपाकडे सध्या असलेला पैसा कुठून आला?

भाजपाची पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे आहे, तुमच्याकडे नाही

सरकारकडे पैसा नाही, फक्त लोकांसमोर जाहिरातबाजी चालू आहे 

बाळासाहेबांच्या नावाखाली भ्रष्टाचार लपवण्याचं काम सुरु आहे

गेल्या पाच वर्षात काय काम केलं, त्याचं उत्तर द्या

मुख्यमंत्री मला वर्गातले मॉनिटर वाटतात

महापौरांच्या बंगल्यावर शिवसेनेचा डोळा

भाजपा-शिवसेनेची फक्त बॅनरबाजी

मराठी शाळा बंद होता आहेत आणि उर्दू शाळा वाढतायंत

'मी जे बोलतो ते करून दाखवतो'

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा