Advertisement

एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये शिवसेना, काँग्रेसचे नाराज आमदार असल्याची चर्चा

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही अपेक्षित विजय न मिळाल्याने महाविकास आघाडीत पाय फुट पडण्याची शक्यता!

एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये शिवसेना, काँग्रेसचे नाराज आमदार असल्याची चर्चा
SHARES

राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत अपेक्षित विजय न मिळाल्याने महाविकास आघाडीची पडझड  सुरू झाली आहे. गुजरातमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच शिवसेनेचे काही आमदार तसेच काँग्रेसचे आमदारही असण्याची शक्यता आहे.

नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती  समोर येत आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत.

यासोबतच काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा