राज्य सरकारच्या धोरणामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होत आहेत. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' (magnetic maharashtra) सारखी एकही औद्योगिक (industry) परिषद आयोजित केलेली नाही.
राज्यात येणारे उद्योग इतर राज्यात जात असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धोरणाचा फटका या उद्योगांना बसत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने मर्सिडीज बेंझसारख्या कंपन्यांची अचानक तपासणी केली. यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवर परिणाम होण्याची भीती शिवसेना ठाकरे गटाचे (shivsena ubt) नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या उद्योग धोरणावर टीका करताना आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र (maharashtra) आयोजित न करण्यावर आक्षेप घेतला. तामिळनाडूसारखी राज्ये महाराष्ट्रात अशा परिषदांचे आयोजन करून गुंतवणूक आकर्षित करत असताना, राज्यात गुंतवणूक परिषदा का आयोजित केल्या जात नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुणे दौऱ्यावर असताना मर्सिडीज बेंझ कंपनीला भेट दिली होती. त्यावेळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत आक्षेप घेण्यात आले होते. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षांवर निशाणा साधला.
मोठे उद्योग परदेशात जात असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने मर्सिडीज बेंझच्या अचानक केलेल्या तपासणीमुळे औद्योगिक जगतात चुकीचा संदेश गेला आहे.
हेही वाचा