Advertisement

मनसेला एनडीएमध्ये घेण्यास ‘या’ नेत्याचा विरोध

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुकांचेही वारे वाहत आहेत.

मनसेला एनडीएमध्ये घेण्यास ‘या’ नेत्याचा विरोध
SHARES

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुकांचेही वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या मनसे आणि भाजपाची जवळीक वाढत आहे. त्यामुळे राजकाय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.

आगामी पालिका निवडणुक दोन्ही पक्ष एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मनसेला एनडीएत सहभागी करून घेण्यास किंवा त्यांच्यासोबत निवडणूक लढण्यास एका नेत्याने विरोध केला आहे.

मनसे-भाजप एकत्र येण्याबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनसेला सोबत घेण्याचा काहीही फायदा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच मनसेनेही मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केले आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र, राज ठाकरेंची बदललेली भूमिका आणि भाजपची राज ठाकरेंसोबत वाढलेली जवळीक त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चा होत आहेत.

रिपाइं (आ)चे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भाजप-मनसे एकत्र येण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मनसेचा भाजप आघाडीला कुठलाही फायदा नाही.

राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही, असे आठवले यांनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंना युतीत किंवा एनडीएमध्ये घेण्यास रामदास आठवलेंनी विरोध दर्शवला आहे. सतत भूमिका बदलणारे मनसेचे राज ठाकरे यांची आम्हाला गरज नाही. त्यांनी आमच्या कडे येऊ नये, असेही ते म्हणाले.



हेही वाचा

प्रभू राम बोलतील तेव्हा अयोध्येला जाऊ : राज ठाकरे

बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला मंजुरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा