दादर विभागात वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त

 Dadar
दादर विभागात वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त
दादर विभागात वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त
See all

शिवाजी पार्क - मराठा मूक मोर्चाचा मुद्दा सामनाच्या व्यंग चित्रातून मुंबईत भलताच गाजला. त्यामुळे मुंबईतल्या मराठा मोर्चाकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवार 6 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये बाइक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याकरता मुंबई पोलिसांनी विषेश लक्ष घालून ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांच्या तुकड्या प्रत्येक चौकात तैनात केल्या. दादरमध्ये सेनाभवन परीसरात सकाळी सहा वाजल्यापासून पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळाला खोदादाद सर्कल, शिवाजी पार्क, सेनाभवन परिसरात रॅलीचे विषेश नियोजन नसतानाही दादर पोलिसांनी सतर्कतेनं टाळण्यासाठी काळजी घेतलेली दिसून आली. दादर शिवाजी पार्क परिसर मुख्य जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी कडक बंदोबस्त होता आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

Loading Comments