घाटकोपरच्या पंतनगरमध्ये होणार चुरशीची लढत

 Pant Nagar
घाटकोपरच्या पंतनगरमध्ये होणार चुरशीची लढत
Pant Nagar, Mumbai  -  

घाटकोपर - महापालिका निवडणुकीत प्रभाग 131 मध्ये नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार राखी जाधव, शिवसेनेच्या मंगल भानुशाली आणि भाजपाचे भालचंद्र शिरसाट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपामधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या मंगल भानुशाली यांना राष्ट्रवादीच्या उमेदवार राखी जाधव यांचे मोठे आव्हान वाटत आहे, असे मंगल भानुशाली यांनी स्पष्ट केले. जो योग्य उमेदवार असेल त्यांनाच मतदार निवडून देणार असल्याचे भाजपाचे उमेदवार भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले. मला कोणाचे ही आव्हान वाटत नाही कारण गेल्या पाच वर्षांत मी लोकांसाठी खूप कामे केली आहेत. मला पुन्हा भरघोस मतांनी पंतनगरमधील नागरिक विजयी करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या उमेदवार राखी जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments