Advertisement

आरेतील आदिवासींना आरेमध्येच मिळणार पक्की घरं


आरेतील आदिवासींना आरेमध्येच मिळणार पक्की घरं
SHARES

आरेतील आदिवासी पाड्यात राहणार्‍या रहिवाशांना लवकरच पक्की बैठी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आरेतील अन्य पात्र झोपडीधारकांनाही प्राणीसंग्रहालयासाठी राखीव जागेवर आरक्षण बदलून घरे बांधून देण्यात येतील, असं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना दिलं.


१० हजार रहिवाशांना दिलासा

आरेमध्ये २७ आदिवासी पाडे तर ठिकाणी विखुरलेल्या झोपड्या मिळून सुमारे १० हजारांच्या घरात रहिवासी रहात आहेत. हरित लवादाच्या आदेशामुळे येथील रहिवासी शौचालय, पिण्याचे पाणी, वीज तसेच अन्य मूलभूत सुविधांपासून वंचित अाहे. येथील पाड्यांच्या जवळपास बिबट्याचा वावर असल्याने बिबट्याने येथील रहिवाशांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यात काहींचे मृत्यृही झाले आहे. त्यामुळे या आदिवासी पाड्यांना गावठणांचा दर्जा देऊन येथील रहिवाशांचं आरेत एकाच ठिकाणी पक्की घरे बांधून स्थलांतरीत करण्यात यावं, अशी मागणी रवींद्र वायकर गेली अनेक वर्षे करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार पात्र झोपडीधारकांनाही स्थलांतरीत करण्यात यावं, अशी विनंतही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.


प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

त्यानुसार नुकत्याच मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या भेटीत याप्रश्‍नी चर्चा झाली. त्यानुसार आरेतील आदिवासी पाड्यांना गावठणांचा दर्जा देऊन त्यांना आरेतच बैठी पक्की घरे देण्यात येतील तसेच शासनाच्या नियमानुसार अन्य पात्र झोपडीधारकांनाही आरेतील प्राणीसंग्रहालयासाठी आरक्षित जागेचं आरक्षण उठवून तिथं घरे देण्यात येतील, असं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण वायकर यांना दिलं. एवढंच नव्हे तर तसा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे आदेशही मुख्यमंत्री यांनी गृहनिर्माण विभागाला दिले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा