मुख्यमंत्र्यांनी केलं इंदिरा गांधींच्या फोटोला अभिवादन

 Churchgate
मुख्यमंत्र्यांनी केलं इंदिरा गांधींच्या फोटोला अभिवादन
Churchgate, Mumbai  -  

मुंबई - माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सहाय यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव श्या.ग.चैारे यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments