ये फिल्म है 'मुश्किल' ?

  मुंबई  -  

  खार - मनसे चित्रपट सेनेने सिनेनिर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉक्शनच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. करण जोहरचा आगामी सिनेमा ‘ए दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान हा एक भूमिका साकारतोय. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका मनसेनं घेतलीय.

  आंदोलनादरम्यान काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकही केले. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने मुंबईतील सर्व पाक कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिला होता. तसंच ज्या सिनेमा आणि मालिकांमध्ये पाकिस्तानी कलाकार असतील, त्या बंद पाडू असंही मनसेनं स्पष्ट केले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.