तुळजापूरहून आणलेली मशाल ठरली आकर्षण

  मुंबई  -  

  शिवाजी पार्क - तुळजाभवानी मंदिरातून आणलेली मशाल मंगळवारच्या दसरा मेळाव्यात आकर्षणाचे केंद्र ठरली. ही मशाल उस्मानाबाद येथून आलेल्या शिवसैनिकांनी आणली होती.

  दसरा मेळाव्यासाठी उस्मानाबाद मधील बुम परांडा येथील शिवजल क्रांती सावंत प्रतिष्ठान येथील शिवसैनिकही आले होते. हातात धनुष्यबाण आणि पेटती मशाल घेऊन आलेल्या या शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यांचा उत्साह पाहून इतर शिवसैनिकांनाही स्फूरणा चढत होते. दसरा मेळाव्यासाठी तुळजापूरच्या तुऴजा भवानी मंदिरातून पेटवून आणली जाते. खासदार रवींद्र गायकवाड यांनी या प्रथेला 4 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. प्राध्यापक शिवाजी सावंत शिवसेना उपनेते यांच्या नेतृत्वाखाली हे शिवसैनिक आले होते.

  शिवाजी पार्क बाहेर दसरा मेळाव्यामुळे अनेक वस्तू विकणारे स्टॉल लावण्यात आले होते. दसरा मेळाव्यात दरवर्षी स्टॉल लावणारे ज्येष्ठ व्यावसायिक उत्तम काळे म्हणाले, 'गेली 50 वर्षे मी या ठिकाणी स्टॉल लावतो. शिवतीर्थावर आलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने ते या वस्तूंची खरेदी देखील करतात. यंदा महागाई जरी असली तरी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते', असे त्यांनी सांगितले. दसरा मेळाव्यात पुरुषांसोबतच महिलांची उपस्थिती देखीव लक्षणीय होती. त्यांनी केसरी रंगाच्या साड्या आणि केसरी टोप्या घातल्या होत्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.