दोन माजी आमदार निवडणूक रिंगणात

 Mumbai
दोन माजी आमदार निवडणूक रिंगणात
Mumbai  -  

मुंबई - मागील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेले मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे आणि मुंबादेवीतील भाजपाचे माजी आमदार अतुल शाह आता मुंबई महापालिका निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

मनसेतून भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार नगरमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. तर, माजी आमदार अतुल शाह हे गिरगाव कुंभारवाडा येथील प्रभाग 220 मधून निवडणूक लढवणार आहेत. या मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर सुरेंद्र बागलकर आणि काँग्रेसच्या वतीने शांतीलाल दोषी हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या परिसरात सध्या काँग्रेसचे नगरसेवक फय्याज खान हे सुद्धा माजी आमदार आहेत.

Loading Comments