एका वॉर्डात भाजपाचे दोन उमेदवार

 Mumbai
एका वॉर्डात भाजपाचे दोन उमेदवार

मुंबई - महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती. आर उत्तर विभागातल्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये भाजपाने महिला नेत्या नीलाबेन सोनी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नीलाबेन सोनी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेतून तिकीट न मिळालेल्या नाराज गज्या साळवी यांनीही भाजपात प्रवेश केला होता. त्यांनीही शुक्रवारी भाजपाकडून वॉर्ड क्रमांक 6 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे भाजपात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या संदर्भात निवडणूक कार्यालयाच्या अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितलं की ज्याने आधी अर्ज दाखल केला त्याचाच अर्ज अधिकृत मानला जाईल.

Loading Comments