टायपिंग मिस्टेकनं घातला घोळ

 Pali Hill
टायपिंग मिस्टेकनं घातला घोळ

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ट्विटमध्ये झालेल्या चुकीमुळे ते चर्चेत आलेत. 'मी खिशात परळीच्या विकासाची ब्लू फिल्म आणि रोड मॅप घेऊन फिरत असतो. मात्र ज्यांना भीती असते ते स्वत:चा राजीनामा घेऊन फिरत असतात' अशा आशयाचे त्यांनी ट्विट केलं होतं. त्यांना ब्लू प्रिंट म्हणायचं होतं मात्र अनवधानानं त्यांच्याकडून टाईप करताना ब्लू फिल्म असं झालं. मात्र ज्यावेळी त्यांच्या ही चूक लक्षात आली तेव्हा मात्र त्यांनी आपली चूक सुधारत पुन्हा ट्विट केल.

Loading Comments