आराखडा कुणाचा? शिवसैनिकांचा

    मुंबई  -  

    शिवाजी पार्क - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक कसं असेल? लाखो शिवसैनिकांना सतावणा-या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवरच सोपवलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ‘महापौर निवास’ची जागा देणं जवळपास निश्चित झालंय. पण स्मारक विश्वस्त समितीनं अद्याप स्मारकाचा आराखडा तयार केलेला नाही. बाळासाहेब-शिवसैनिकांमधलं अद्वैत सांगत उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवसैनिकांना भावनिक साद घातलीय. बाळासाहेब म्हणजे लाखो शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान. गेली चार वर्ष बाळासाहेबांचं स्मारक अनेक कारणांमुळे रखडलं. शिवसेना-भाजपा संबंधांमध्ये वाढत चाललेला विसंवाद हे त्यातलं एक कारण. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेता मनोहर जोशी मात्र याबाबतीत निश्चिंत आहेत. किंबहूुना स्मारक समितीत सदस्य वाढतील, असंही त्यांना आशा वाटतेय. बाळासाहेबांना मानणा-या शिवसैनिकांना आपल्या महानेत्याच्या स्मारकासाठी होणारा विलंब खटकतोय. पण खुद्द शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबतीतसुद्धा संयमी आहेत.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.