Advertisement

उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्यांचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आज गंभीर आरोप केले.

उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्यांचा आरोप
SHARES

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर आज गंभीर आरोप केले. मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा बोगस बुलेटप्रुफ जॅकेटमुळेच हेमंत करकरेंसारख्या अधिकाऱ्यांचा दहशतवादी अजमल कसाबने जीव घेतला. त्यानंतर झालेल्या चौकशीत हे बोगस जॅकेट ज्या कंपनीने पुरवले त्यात शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुलाची भागीदारी असल्याचे समोर आले आहे, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

यशवंत जाधवांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीदेखील व्यावसायिक भागीदारी आहे, असे सांगत याप्रकरणात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच संशय व्यक्त केला.

सोमय्या म्हणाले, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या बुलेटप्रुफ जॅकेटबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा विमल अग्रवाल याच्या समर्थ इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने हे बोगस जॅकेट पुरवल्याचे समोर आले होते.

विमल अग्रवालला तेव्हा अटकही झाली होती. सध्या तो जामिनावर आहे. याच समर्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुलाची भागीदारी आहे. म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या व्यावसियाक पार्टनरचा या कंपनीतही सहभाग होत असल्याचे स्पष्ट होते. तेव्हा उद्धव ठाकरेंचाही या कंपनीसोबत काही व्यवहार आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान किरीट सोमय्यांनी दिले.

हसन मुश्रीफ यांच्या जेन कन्स्लटेशनने 40 हजार शेतकऱ्यांकडून 16 कोटी जमा केले, असा आरोपही यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. शेतकऱ्यांचे नेते असलेले शरद पवार याप्रकरणी गप्प का?, असा सवालही त्यांनी केला. तसेच, याप्रकरणाची चौकशी सुरू झाली असून हसन मुश्रीफ यांनी उलटी गिनती सुरु करावी, असे सोमय्या म्हणाले.



हेही वाचा

25 मेला भारत बंदची घोषणा

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच - संजय राऊत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा