Advertisement

फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती

राज्याचा अर्थसंकल्प हा काहीसा किचकट विषय असतो. अनेकदा सामान्यांना त्यातील अनेक तरतुदी, घोषणा, आश्‍वासनं याबाबतची माहिती या पुस्तकात असणार आहे

फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती
SHARES

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार ४ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील विधानभवन या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

हेही वाचाः- ​Exclusive बर्वेंच्या कारवाईवर परमबीर सिंहांची स्थगिती, ‘या’ अधिकाऱ्यांचं केलं भलं​​​

अर्थसंकल्प सोप्या भाषेत असे पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना लाभली आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा काहीसा किचकट विषय असतो. अनेकदा सामान्यांना त्यातील अनेक तरतुदी, घोषणा, आश्‍वासनं याबाबतची माहिती या पुस्तकात असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती असणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.

हेही वाचाः- ​कोरोनाची दहशत महाराष्ट्रातही, अमेरिकी कंपनीने केला दावा​​​

महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाल्यापासून भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षात विस्तव जात नाही. हे महाराष्ट्र पाहतोच आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्य उपस्थिती असणार आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हेही वाचाः- दादरकरांना घराजवळ करता येणार गाड्या पार्क

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा