Advertisement

स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात- मुख्यमंत्री


स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात- मुख्यमंत्री
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होतं शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाच्या लोकार्पणाचं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील महापौर बंगल्यात करण्यात आलं होतं.


'सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल'

बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरकार त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.



त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील बहुतांश सर्वच मंत्री शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा