केंद्र सरकारने लक्ष्मी ओरबाडून नेली, आता लक्ष्मीपूजन कसे करायचे? - उद्धव ठाकरे


SHARE

आधी सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबडून घेतली आणि आता ऐन दिवाळीच्या तोंडावर जीएसटीचे दर कमी करून सर्वसामान्यांना भेट दिल्याचा आव केंद्र सरकार आणत आहे. केंद्र सरकारने ही भेट स्वत:हून दिलेली नाही. तर सर्वसामान्यांच्या संतापानं मस्तवाल सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मोदी सरकारने आता दिवाळीत सर्वसामान्यांना कुठलाही त्रास देऊ नये, हिच त्यांच्याकडून सर्वसामान्यांसाठी भेट ठरेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

शिवसेना भवनात तातडीने बोलवलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी जीएसटी, लोडशेडिंग, फेरीवाले आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले.


काय म्हणाले उद्धव ?

 • जीएसटी दरात जी सवलत दिली आहे, त्याबद्दल तुमचं नक्कीच अभिनंदन 
 • पण, जीएसटी म्हणून इतके दिवस वसूल केलेला कर सरकार परत करणार का?
 • हा निर्णय घेण्यासाठी इतकी वाट का पाहावी लागली?
 • मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जनतेने झुकवल्याचा हा परिणाम आहे
 • छोटे व्यापारी सुखावले असले, तरी सर्वसामान्य अजूनही त्रस्त आहेत 
 • भारनियमनाच्या झळा बसत आहेत, लोकांचा अंत पाहू नका
 • भारनियमन तातडीने रद्द करा, तात्पुरता दिलासा नको
 • कोळशाचा तुटवडा होणार हे आधी कळालं नाही का?
 • जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका
 • जीएसटीत सूट देऊन सरकारनं दिवाळीची भेट दिली असं चित्र निर्माण करण्यात आलं
 • हे चित्र पूर्णपणे चुकीचं आहे. सरकार सर्वसामान्यांना शब्दांच्या जाळ्यात अडकवतंय
 • उलट दिवाळीत त्रास देणार नसाल, तर तीच मोदींची भेट असेल
 • रेल्वेच्या फूटओव्हर ब्रीजवरील फेरीवाल्यांचा प्रश्न शिवसेनेमुळे सुटला
 • अंगणवाडीसेविकांच्या संपावर तोडगा काढल्याने राज्य सरकारचे आभारडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय