Advertisement

उद्धव ठाकरेंनी दिला 'या' 3 चिन्हांचा आणि नावांचा पर्याय, पहा कोणती आहेत

शिवसेनेची ३ चिन्ह आणि ३ नावे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. या चिन्हांबद्दल आणि नावांबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

उद्धव ठाकरेंनी दिला 'या' 3 चिन्हांचा आणि नावांचा पर्याय, पहा कोणती आहेत
SHARES

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्यात आलं आहे. त्यानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेची ३ चिन्ह आणि ३ नावे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. या चिन्हांबद्दल आणि नावांबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि ढगढगती मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. तर ३ नावांचा पर्याय देखील देण्यात आला आहे. पहिलं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावांचे असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. 

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह पोहचवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.  

यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर देखील टीका केली. 40 डोक्याच्या रावणानं प्रभु रामाचं शिवधनुष्य गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं. गोठलेल्या रक्तवाल्याचं इकडे कामच नाही. उलट्या काळजावाल्याचं काम नाही. अशी काही माणसं आणि त्यांची माणसं फिरतात, त्याचा राग येतो. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. अशी ही उलट्य़ा काळजाची लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं. त्यांना आनंदानं उकळ्या फुटत असतील. पण त्याही मागे त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असेल.बघा आम्ही करुन दाखवलं.  जे आम्हाला जमलं नाही,  ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवलं. कशीही माणसं काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 



हेही वाचा

मोठी बातमी! निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवलं; पक्षाचं नाव वापरण्यासही मनाई

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास जाणून घ्या, बाळासाहेबांचा 'हा' होता हेतू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा