उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी!

    मुंबई  -  

    वर्सोवा - अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा मतदार संघातील शाखा क्र. 61, 64, 68, 69, 67 आणि 71 या शाखांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आगामी पालिका निवडणुकीचा आढावा घेतला. आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्या पार्श्वभूमीवर कामाला लागा असा आदेशच या वेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. पालिकेवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान खासदार गजानन किर्तीकर, विभागप्रमुख अॅड. अनिल परब, महिला विभाग संघटक राजुल पटेल उपस्थित होते.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.